सूर्यातें निवटी चंद्रातें घोंटी
suryaten nivati chandraten ghonti
सूर्यातें निवटी चंद्रातें घोंटी । उन्मनि नेहटीं बिंबाकार ॥ १ ॥
suryaten nivati chandraten ghonti
सूर्यातें निवटी चंद्रातें घोंटी । उन्मनि नेहटीं बिंबाकार ॥ १ ॥
sej siddha jhali nija dhidhara | adnya dyavi lokan jati apulya ghara
सेज सिद्ध झाली निजा धीधरा । आज्ञा द्यावी लोकां जाती आपुल्या घरा ॥१॥ रात्र बहुत जाहाली देवा चला मंदिरा । राईरखुमाबाई वाट पाहाती सुंदर ॥२॥
seje suta bhumi palakha
सेजे सुता भूमी पालखा निजलता उसांसया ।
sejecha ekant agipashin kale | jhankiliya dole adhahpat
सेजेचा एकांत आगीपाशीं कळे । झांकिलिया डोळे अधःपात ॥१॥ राहो अथवा मग जळो अगीमधीं । निवाडु तो आधीं होऊनि गेला ॥ध्रु.॥
setya na chaudhari | pandepan vahe shirin
सेट्या ना चौधरी । पांडेपण वाहे शिरीं ॥१॥ जकातीचा धंदा । तेथें पाप वसे सदा ॥२॥
set alen sugi sambhalave chari kon | pika alen pari kelen pahije jatan
सेत आलें सुगी सांभाळावे चारी कोण । पिका आलें परी केलें पाहिजे जतन ॥१॥ सोंकरीं सोंकरीं सोहंकरी विसावा तों वरी । नकोउभें आहे तों ॥ध्रु.॥
set kara re phukachen | nam vithobarayachen
सेत करा रे फुकाचें । नाम विठोबारायाचें ॥१॥ नाहीं वेठी जेवा सारा । जाहाती नाहीं म्हणियारा ।
sendarin hendarin daivaten | kon tin puji bhutenketen | apulya pota jin radaten | magati shiten avadan
सेंदरीं हेंदरीं दैवतें । कोण तीं पुजी भुतेंकेतें । आपुल्या पोटा जीं रडतें । मागती शितें अवदान ॥१॥ आपुले इच्छे आणिकां पीडी । काय तें देईल बराडी । कळों ही आली तयाची जोडी । अल्प रोकडी बुद्धी अधरा ॥ध्रु.॥
sena nhavi bhakta mala tenen dev bhulavila
सेना न्हावी भक्त मला तेणें देव भुलविला ॥ १ ॥ नित्य जपे नामावळी लावी विठ्ठलाची टाळी।।२।।
sel dili maga aisi | jen jen tumhansi avade
सेल दिली मागा ऐसी । जें जें तुम्हांसी आवडे ॥१॥ तरी दयाहो आपुलें नाम । अखंडित प्रेम नैसर्गिक ॥२॥
sevakachi pari sthapila padin | mag tyachiye budhdi kon tuke
सेवकाचि परि स्थापिला पदीं । मग त्याचिये बुध्दी कोण तुके ॥१॥ तैसेंचि केलें मजही देवा । निपेक्ष अवघा दावूनियां ॥२॥
sevakasi adnya niropasi kam | svamiche te dharma svami jane
सेवकासी आज्ञा निरोपासी काम । स्वामीचे ते धर्म स्वामी जाणे ॥१॥ मनाचिये मुळीं रहावें बैसोन । आकर्षावे गुण पायांपाशीं ॥ध्रु.॥
sevakasi adnya svamichi praman | jonvari ha pran jay tyacha
सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण । जोंवरी हा प्राण जाय त्याचा ॥१॥ आणिकांचा धाक न धरावा मनीं । निरोपावचनीं ढळों नये ॥ध्रु.॥
sevaken karaven sangitalen kam | sikyacha to dharma svami rakhe
सेवकें करावें सांगितलें काम । सिक्याचा तो धर्म स्वामी राखे ॥१॥ काय देवा नेणों आलें गांढेपण । तुम्ही शिक्तहीन झाले दिसां ॥ध्रु.॥
sevaken karaven svamichen vachan | tyasi huntumpan kama naye
सेवकें करावें स्वामीचें वचन । त्यासी हुंतूंपण कामा नये ॥१॥ घेईल जीव कां सारील परतें । भंगलिया चित्तें सांदी जनां ॥ध्रु.॥
sevat to bhala | majha bahu god jala
सेवट तो भला । माझा बहु गोड जाला ॥१॥ आलों निजांच्या माहेरा । भेटों रखुमाईच्या वरा ॥ध्रु.॥
sevat to hoti tujhiyanen god | mhanauni chad dharitason
सेवट तो होती तुझियानें गोड । म्हणऊनि चाड धरीतसों ॥१॥ देऊं भोगाभोग कलिवरचा भार । साहों तुज थार त्याचमधीं ॥ध्रु.॥
sevatasi jari alen | tari jalen andhalen
सेवटासी जरी आलें । तरी जालें आंधळें ॥१॥ स्वहिताचा लेश नाहीं । दगडा कांहीं अंतरीं ॥ध्रु.॥
seva te avadi uchcharaven nam | bhedabhedakam nivaruni
सेवा ते आवडी उच्चारावें नाम । भेदाभेदकाम निवारूनि ॥१॥ न लगे हालावें चालावें बाहेरी । अवघें चि घरीं बैसलिया ॥ध्रु.॥
sevitan kathasar amrut | tenen god jale bhakta
सेवितां कथासार अमृत । तेणें गोड जाले भक्त ॥१॥ मातले मरणातें मारिती । धाके पळती यमदुत ॥२॥