भजनी मालिका
← भजनांकडे परत

सेट्या ना चौधरी । पांडेपण वाहे शिरीं

setya na chaudhari | pandepan vahe shirin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सेट्या ना चौधरी । पांडेपण वाहे शिरीं ॥१॥ जकातीचा धंदा । तेथें पाप वसे सदा ॥२॥ गाई म्हैसी हेड । तुप विकी महा द्वाड ॥३॥ तुका म्हणे पाहीं । तेथें पुण्या रीघ नाहीं ॥४॥