भजनी मालिका
← भजनांकडे परत

सेजे सुता भूमी पालखा

seje suta bhumi palakha

सेजे सुता भूमी पालखा निजलता उसांसया । गगन पासोडा मेरु कानवडा ते सुख वाड पहुडलया ॥१॥ सहज संभोगु भोगु जाणवा । विजया होई मग भोगि राणिवा ॥२॥ कमळणी बाळा गुंफ़िती माळा घालिती गळां देव कन्या । तिचिये शेजारीं सतरावी सुंदरी चंद्रसूर्य दोन्ही चवरी ढाळिती ॥३॥ येकु त्यागी दुसरा भोगी तिसरा योगी राजाइंद्र । चौथे द्वारीं अतीत पै बैसले गुंफ़े ज्ञानदेवो ॥४॥