भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांवळिये बुंथी सांवळिया रुपें

sanvaliye bunthi sanvaliya rupen

सांवळिये बुंथी सांवळिया रुपें । सांवळिया स्वरुपें वेधियेलें ॥१॥ काय करुंगे माये सांवळे न सोडी । इंद्रियां इद्रियां जोडी एकतत्त्वें ॥२॥ कैसें याचें तेज सांवळे अरुवार । कृष्णी कृष्ण नीर सतेजपणें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचे खुणे । सांवळेची होणें यासी ध्यातां ॥४॥