भजनी मालिका
← भजनांकडे परत

सावधान ऐसें काय तें विचारा । आले हो संसारा सकळ ही

savadhan aisen kay ten vichara | ale ho sansara sakal hi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सावधान ऐसें काय तें विचारा । आले हो संसारा सकळ ही ॥१॥ अंतीं समयाचा करणें विचार । वेचती सादर घटिका पळें ॥ध्रु.॥ मंगळ हें नोहे कन्यापुत्रादिक । राहिला लौकिक अंतरपाट ॥२॥ तुका म्हणे देव अंतरला दुरी । डोळिया अंधारी पडलीसे ॥३॥