भजनी मालिका
← भजनांकडे परत

सावध सावध राजाई हो सुखें । नामयानें दुःख निरसिलें

savadh savadh rajai ho sukhen | namayanen duhkh nirasilen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सावध सावध राजाई हो सुखें । नामयानें दुःख निरसिलें ॥१॥ संसार सांतें या येऊनि भाग्याचा । छंद विठ्ठलाचा लागला यासी ॥२॥ याचें नाम ऐसें न दिसे त्रिभुवनीं । नायकों दुजें कर्णीं नाम्या ऐसें ॥३॥ वैष्णवांचे गजर टाळघोष दिंडी । उभयतां ब्रह्मांडीं घोष गेला ॥४॥ तयाच्या दर्शनें कलिमाजीं तारिलीं । भाग्यें विनटलीं विठठलेंसी ॥५॥ राजाई म्हणे माते रखुमाई बुद्धिवंते । आमुच्या अदृष्टातें लिहिलें कैसें ॥६॥