भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्व भाग्यहीन । ऐसें सांभाळिलों दीन

sarva bhagyahin | aisen sambhalilon din

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सर्व भाग्यहीन । ऐसें सांभाळिलों दीन ॥१॥ पायीं संतांचे मस्तक । असों जोडोनि हस्तक ॥ध्रु.॥ जाणें तरि सेवा । दीन दुर्बळ जी देवा ॥२॥ तुका म्हणे जीव । समर्पून भाकीं कींव ॥३॥