भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्व भावें सुख असतां घेई अनुताप । मग करी संकल्प भजनाचा

sarva bhaven sukh asatan ghei anutap | mag kari sankalpa bhajanacha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्व भावें सुख असतां घेई अनुताप । मग करी संकल्प भजनाचा ॥१॥ ऐसा अनुताप घडतां मनासी । भजन तें सुखासी येत स्वभावेंची ॥२॥ एका जनार्दनीं अनुतापाविण । भजन प्रमाण नोहे देवा ॥३॥