भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्व काळ डोळां बैसो नारायण । नयो अभिमान आड पुढे

sarva kal dolan baiso narayan | nayo abhiman ad pudhe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सर्व काळ डोळां बैसो नारायण । नयो अभिमान आड पुढे ॥१॥ धाड पडो तुझ्या थोरपणावरी । वाचे हरीहरी उच्चारीन ॥ध्रु.॥ जळो अंतरींचें सर्व जाणपण । विवादवचन अहंतेचें ॥२॥ सकळां चरणीं गळित माझा जीव । तुका म्हणे भाव एकविध ॥३॥