भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्व देवांचा हा देव । उभा राहे विटेवरी

sarva devancha ha dev | ubha rahe vitevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्व देवांचा हा देव । उभा राहे विटेवरी ॥१॥ त्याचे ठायीं भाव माझा । न दिसे दुजा पालटु ॥२॥ वारंवार ठेवीन डोई । उगेच पायीं सर्वदा ॥३॥ न मागें भुक्ति आणि मुक्ति । संतसंगति मज गोड ॥४॥ त्यांचें वेड माझें मनीं । शरण एका जनार्दनीं ॥५॥