भजनी मालिका
← भजनांकडे परत

सनकादिक वेडे । शुक नागवे उघडे । भुलविले रोकडे । जडभरतासी

sanakadik vede | shuk nagave ughade | bhulavile rokade | jadabharatasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सनकादिक वेडे । शुक नागवे उघडे । भुलविले रोकडे । जडभरतासी ॥१॥ पुंडलिकें जगजेठी । उभा केला वाळुवंटी । अद्यापि पैं नुठी । धरणें त्याचें ॥२॥ कटीवर ठेउनी हात । उभा असे तिष्ठत । घेतलें तें निश्चित । देणॆं नाहीं ॥३॥ धरणें न मागतां पूर्ण । उडवी माणुसपण । जीवा जीवपण । उरों नेदी ॥४॥ एका जनार्दनीं एकपणाच्या वाणी । आपणा देउनी । देवो समूळ खत फ़ाडी ॥५॥