भजनी मालिका
← भजनांकडे परत

आदिनाथ उमाबीज प्रकटिलें

adinath umabij prakatilen

आदिनाथ उमाबीज प्रकटिलें । मछिंद्रा लाधली सहजस्थितीं ॥ १ ॥ तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली । पूर्ण कृपा केली गयनिनाथा ॥ २ ॥ वैराग्यें तापला सप्रेमें निवाला । ठेवा जो लाधला शांतिसुख ॥ ३ ॥ निर्द्वद्व निःशंक विचरतां मही । सुखानंद ह्रदयीं स्थिर जाला ॥ ४ ॥ विरक्तीचें पात्र अन्वयाचें मुख । देऊनि सम्यक अनन्यता ॥ ५ ॥ निवृत्ति गयनी कृपा केली असे पूर्ण । कूळ हें पावन कृष्णनामें ॥ ६ ॥