भजनी मालिका
← भजनांकडे परत

आंधळ्याची काठी । अडकली कवणें बेटीं

andhalyachi kathi | adakali kavanen betin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आंधळ्याची काठी । अडकली कवणें बेटीं ॥१॥ माझिये हरणी । गुंतलीस कोणे रानीं ॥२॥ मुकें मी पाडस । चुकलें भोवें पाहें वास ॥३॥ तुजवीण काय करूं । प्राण किती कंठीं धरुं ॥४॥ आतां जीव जाऊं पाहे । धांव घालीं माझे आये ॥५॥ माझी भेटवा जननी । संतां विनवी दासी जनी ॥६॥