भजनी मालिका
← भजनांकडे परत

आंधळ्यानें स्वंरूप देखियलें नयनीं । मुकें बहिर्‍या कानीं गोष्टी सांगे

andhalyanen svanrup dekhiyalen nayanin | muken bahir‍ya kanin goshti sange

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आंधळ्यानें स्वंरूप देखियलें नयनीं । मुकें बहिर्‍या कानीं गोष्टी सांगे ॥१॥ कांसवीचें दूध दुहितां भरणा । दुही त्याला जाणा हात नाहीं ॥२॥ वारियाच्या लोथा बांधोनियां माथां । वांझेचिया सुता बळिवंता ॥३॥ मुंगीनें त्नैलोक्य धरियलें तोंडीं । नामा म्हणे पिंडीं प्रचीत आहे ॥४॥