भजनी मालिका
← भजनांकडे परत

आंधळ्याची काठी अडकली कवणें बेटीं

andhalyachi kathi adakali kavanen betin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
आंधळ्याची काठी अडकली कवणें बेटीं ।।१।। माझिये हरणी । गुंतलीस कोणे रानीं ॥२॥ मुर्के मी पाडस चुकलें भोवें पाहें वास ॥३॥ तुजवीण काय करूं प्राण किती कंठीं धरूं ॥४॥ आतां जीव जाऊं पाहे धांव घालीं माझें आये ॥५॥ माझी भेटवा जननी संतां विनवी दासी जनी ॥६॥