भजनी मालिका
← भजनांकडे परत

आदि मध्ये वावो अवसान अभावो

adi madhye vavo avasan abhavo

आदि मध्ये वावो अवसान अभावो । पाहाताती निर्वाहो हरपला ॥ १ ॥ तें रूप माजिटें गोपवेश खेळे । नंदाचे सोहळे पुरविले ॥ २ ॥ धन्य ते यशोदा खेळवी मुकुंदा । आळवीत सदा नित्य ज्यासी ॥ ३ ॥ निवृत्तिसधर ब्रह्मरूपसार । वृत्तीचा विचार हरपला ॥ ४ ॥