भजनी मालिका

भजने

मीनरूप झाला प्रथम तो हरी । ज्याचा चराचरीं वास होता ॥१॥ मार्कंडेयालागीं दाखविली माया । वटपत्रीं तया रूपासी हो ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मीही संतचरण वंदीतसे माथां । वेदादि साम्यता थोडी तेथें ॥१॥ पुराणासी धाड पडलें सांकडे । शास्त्रांचें तें कोडे उगवेल ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मुकिया साखर चाखाया दिधली । बोलतं हे बोली बोलवेना ॥ १ ॥ तो काय शब्द खुंटला अनुवाद । आपुला आनंद आधाराया ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा

मुकें होतां तुझ्या पदरीचें जातें । मूर्ख तें भोगितें मीमीपण ॥१॥ आपुलिये घरीं मैंद होऊनी बसे । कोणासीहि ऐसे बोलों नको ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

मुक्त तो आशंका नाहीं जया अंगीं । बद्ध मोहोसंगीं लज्जा चिंता ॥१॥ सुख पावे शांती धरूनि एकांत । दुःखी तो लोकांत दंभ करी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

मुक्त होता परी बळें जाला बद्ध । घेउनियां छंद माझें माझें ॥१॥ पाप पुण्य अंगीं घेतलें जडून । वर्म नेणे कोण करिता तो ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

मुक्तपण आम्हां नको देवराया । भेटी मज पायां पुरे बापा ॥१॥ चतुरपणाची नको मज चाड । प्रेमभाव गोड पुरे बापा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव