भजनी मालिका
← भजनांकडे परत

मीनरूप झाला प्रथम तो हरी । ज्याचा चराचरीं वास होता

minarup jhala pratham to hari | jyacha characharin vas hota

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मीनरूप झाला प्रथम तो हरी । ज्याचा चराचरीं वास होता ॥१॥ मार्कंडेयालागीं दाखविली माया । वटपत्रीं तया रूपासी हो ॥२॥ बाळमुकुंदानें स्वरूप दावितां । श्वासोच्छ्वास घेतां चौदाकल्प ॥३॥ पाहोनियां माया अंतरीं निमाला । घाबरा तो झाला ऋषिराज ॥४॥ अश्वासून तया दाखविली माया । धन्य देव-राया नामा म्हणे ॥५॥