भजनी मालिका
← भजनांकडे परत

भेटीची आवडी उत्कंठित चित्त । न राहे निवांत एके ठायीं

bhetichi avadi utkanthit chitta | na rahe nivant eke thayin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भेटीची आवडी उत्कंठित चित्त । न राहे निवांत एके ठायीं ॥१॥ जया देखे तया हेंचि पुसे मात । कां मज पंढरिनाथ बोलविना ॥२॥ कृपेचा सागर विठो लोभपर । माझा कां विसर पडिला त्यासि ॥३॥ माहेरींची आस दसरा दिवाळी । बाहे ठेवुनि निढळ वाटे पाहे ॥४॥ मखे वारकरी पंढरीस जाती । निरोप त्या हातीं पाठवीन ॥५॥ निर्बुजला नामा कंठीं धरिला प्राण । करीतसे ध्यान रात्रंदिवस ॥६॥