भजनी मालिका
← भजनांकडे परत

भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रीं दिवस वाट तुझी

bhetilagin jiva lagalise as | pahe ratrin divas vat tujhi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ॥१॥ पूर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन । तैसें माझें मन वाट पाहे ॥ध्रु.॥ दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची ॥२॥ भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माउलीची ॥३॥ तुका म्हणे मज लागलीसे भूक । धांवूनि श्रीमुख दावीं देवा ॥४॥