भजनी मालिका
← भजनांकडे परत

भोगाची नव्हाळी न सुटे कोणे काळीं । वासना वोंगळी तेचि करी

bhogachi navhali na sute kone kalin | vasana vongali techi kari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भोगाची नव्हाळी न सुटे कोणे काळीं । वासना वोंगळी तेचि करी ॥१॥ वासनेचि थोरी सांगवेना कांहीं । न सुटिजे कांहीं कोण्या काळीं ॥२॥ तारुण्याच्या भरें आवडी स्त्रियेची । वृद्धपण तेंचि पुढें होय ॥३॥ ह्मणतसे पोरें वांचतील कैसीं । हाचि अह-निंशी ध्यास करी ॥४॥ मेलियाही पुढें तेंचि उभें राहे । जन्मोजन्मीं पाहे लागलेंसे ॥५॥ मृगाचिया ध्यासें भरतां मृगपण । जन्मल्यावां-चून सोडीनातें ॥६॥ नामा ह्मणे जया जैसी जे वासना । जन्मकर्में जाणी जैसीं होतीं ॥७॥