भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाव धरुनियां वाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी

bhav dharuniyan vachi dnyaneshvari | krupa kari hari tayavari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भाव धरुनियां वाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी ॥१॥ स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेसी ॥२॥ तोचि ज्ञानेश्वरी वाचे वदतां साचे । भय कळिकाळाचें नाहीं तया ॥३॥ एका जनार्दनीं संशय सांडोनी । दृढ धरा मनीं ज्ञानेश्वरी ॥४॥