भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाई मी जाते माहेराला

bai mi jate maherala

बाई मी जाते माहेराला | माझ्या मूळ घराला ॥१॥ माझ्या मुळीचे तीन सासरे | त्यांत दोन वाईंट आहेत खरे। एक आहे गरिब बिचारा | मानित नाही मी त्याला ॥२॥ माझ्या मुळीचे सहा दीर | काय सांगू मी त्यांचा कुविचार | काम क्रोध मद मत्सर गर्व अहंकार। गांजिती मजला ॥३॥ आशा मनशा इच्छा कल्पनेने | घात केला या चौघीजनीने वासना | नंदुली मोठी चावटुली धरि| गाल गुच्या गाला ॥४॥ माया सासू मोठी | धांगडी हिला प्रपंचाची | गोडी येता जाता | थापडी मारिती गालाला ॥५॥ मोठ्या हौसेने पति | म्या केला जाऊनी राहीली | त्यांच्या घराला परी तो उगा | मौनचि ठेला बोलत नाही मजला ॥६॥ ऐसी मुक्ताई गांजिली या | साधु संतांसी शरण | गेली जाऊनी तेथेची | राहिली मुळ स्वरुपाला ॥७॥