भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाई मी लिहिणें शिकलें सद्गुरुरायाचाही।। ब्रह्म झाला जो चिनाकार देख पुढे ओंकाराची रेख। तूर्या म्हणावें तिसी

bai mi lihinen shikalen sadgururayachahi|| brahma jhala jo chinakar dekh pudhe onkarachi rekh| turya mhanaven tisi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
बाई मी लिहिणें शिकलें सद्गुरुरायाचाही।। ब्रह्म झाला जो चिनाकार देख पुढे ओंकाराची रेख। तूर्या म्हणावें तिसी ।। १ ।। माया महत्तत्त्वाचें सुभर तीन पांचाचा प्रकार। पुढें पंचविसांचा भार। गणति केली छत्तीसी ।।२।। बारा सोळा एकविस हजार आणिक सहाशांचा उबार माप चाले सोहंकार ओळखिले बावन्न मात्रेसी ॥३॥ चार खोल्या चार घरीं चौथे पुरुष चार नारी ओळखुनी सर्वाशी अंतरी राहिले पांचव्यापासीं ॥४॥ पांच शहाणे पांच मूर्ख पांच चालक असती देख पांच दरवडेखोर आणिक । ओळखिलें दोघांसी ।।५।। एक बीजाचा अंकुर होय वृक्षासी विस्तार शाखा – पत्रें फळ फुलभार। बीजापोटीं सामावें ।।६।। कांतीण तंतूशी काढून वरी क्रीडा करिती जाण शेवटीं तंतूशी गिळून एकटी राहे आपसी ।।७।। वेदशास्त्र आणि पुराणा । याचा अर्थ आणितां मना । कनकीं नगाच्या भूषणा अनुभव वाटे जीवासी ||८|| नामदेवाच्या प्रतापांत शिरी विठोबाचा हात जनी म्हणे केली मात पुसा ज्ञानेश्वरासी ॥९॥