भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाईल आधीन होती जे कां नर । ते म्हणों पामर श्वानरूपें

bail adhin hoti je kan nar | te mhanon pamar shvanarupen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बाईल आधीन होती जे कां नर । ते म्हणों पामर श्वानरूपें ॥१॥ नेणती स्वहित कामाचिया वृत्ती । प्रवृत्ति निवृत्ति सोडोनियां ॥२॥ इष्ट मित्र गुरु ऐसा कैसा भाव । सर्वही निर्वाह तेचि एका ॥३॥ नाचविले तिणें तैसे ते नाचती । माकडाच्या गति गारुडयाच्या ॥४॥ नामा म्हणे राजा गुंतला तियेसी । शेंवुडातें माशी हालूं नेणे ॥५॥