भजनी मालिका

भजने

पुंडलीक भक्तराज । तेणें साधियेलें काज । वैकुंठींचें निज । परब्रम्ह आणिलें ॥१॥ पांडुरंग बाळमूर्ती । गाईगोपाळां संगती । येऊनियां प्रीति । उभें सम चि राहिलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पुंडलीक म्हणतां वाचें । पाप जाते रें जन्माचे । जिहीं देखिलें पद यांचे । धन्य भग्याचे नर ते ॥१॥ जाती पंढरीसी आधीं । तुटे तयांची उपाधी । ऋद्धी सिद्धी मांदी । तिष्ठतसे सर्वदा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पुंडलीकालागुनी ह्मणे पांडुरंग । सखा जीवलग तूंची माझा ॥१॥ न पाहासी वास बोलसी उदास । सांडोनियां आस सर्व-स्वाची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पुढलीये जन्मीं नामा तो अंगद । भक्तिभावें तोषविला राम सदगद ॥१॥ परंपरा भक्ति हेचि असे भाक । देऊनियां देवें केलें कौतुक ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पुढिलिया सुखें निंब देतां भले । बहुत वारलें होय दुःख ॥१॥ हें तों वर्म असे माउलीचे हातीं । हाणी मारी प्रीती हितासाठीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पुढीलांचे सोयी माझ्या मना चाली । मताची आणिली नाहीं बुद्धी ॥१॥ केलासी तो उभा आजवरी संतीं । धरविलें हातीं कट देवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

पुढे ऋषिश्रवरांची मांदी । बैसली होती सभासंधी । तेही आशिर्वाद शब्दीं । मंत्रघोषी गर्जिन्नले ॥१॥ मंगळतु-यांचे घोषगजर । दुंदभी वाजविती सुरवर । नंदरायाचें भाग्य थोर । देव वर्णिती निज मुखें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पुढें कालीमाजीं होणार जे भक्त । ते मूर्तिमंत उद्धव पाहे ॥१॥ पाहतां पाहतां समाधि उन्मनीं । गेलासे बुडोनि सुखमाजीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पुढें गांईची खिल्लारें । मागें गोवळ आपण भारें । मुरलीवादन सप्तस्वरें । करीत चालत आनंदे ॥१॥ पांवयाच्या तलालोरी । डफहुडूक त्या भीतरीं । शंख कहाळा वाजवित कुसरीं । गोवळ नाचती भोंवतें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पुढें गेले त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं माग घेत आम्ही ॥१॥ वंदूं चरणरज सेवूं उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनी सांडूं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम