भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुढें चालिला गरुड । आक्रमित अवघें ब्रह्मांड

pudhen chalila garud | akramit avaghen brahmand

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पुढें चालिला गरुड । आक्रमित अवघें ब्रह्मांड । विमान शुभ्र चंड । पुंडलिक आणितसे ॥१॥ धन्य हरिभक्तांचा मेळ । धन्य धन्य तो गोपाळ । धन्य धन्य आळंकापुरी सुढाळ । ज्ञानदेव येतसे ॥२॥ दुरोनी लक्षित रुक्मिणी । हरुषें सांगे चक्रपाणि । पैल विमान येतसे गगनीं । दाखविजे नामया ॥३॥ मग नामयासी सावध । करुनियां तो गोविंद । म्हणे तुझा पुरविला रे छंद । पैल ज्ञानदेव येताहे ॥४॥ नेत्र विकसित पाहे । तंव गगनीम विमान दिसताहे । पुंडलिक गरुड आहे । दिव्य देहीं दिव्य विमानीं ॥५॥ ऐसा जंव तटस्थ घटिका । तंव उतरलें निमिष्य एका । नामा पावला संतोषा । ज्ञानदेवा देखोनी ॥६॥ विमानघंटी गर्जत । नामा पुढाराम चालत । जी जी रुक्मिणी म्हणत । वेगु कीजे ज्ञानदेवा ॥७॥ नामा ज्ञानदेव भेटले । पुंडल्कें विष्णु नमस्कारिले । भक्तीं जयजय शब्द केले । देवीम पुष्पवृष्टि केलिया ॥८॥