भजनी मालिका

भजने

पुंडलिक वरद आनंदें अभेद । विठ्ठल विद्‌गद नाम तुझें ॥१॥ पाव गा वेगीं मजालागीं झडकारी । बुडतों भवसागरीं तारी मज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पुंडलिकाचे भेटीं आणि भींवरेचे तटीं । परब्रह्म उभें वाळुवंटीं मायें ॥१॥ उभा वीटेवरी कर ठेवूनि कटावरी । उभा भीमातीरीं जगजेठी गे माय ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पुंडलिकें आणिला घरां । त्रेलोक्यसोयरा कुटुंबाळू ॥१॥ सोळा सहस्त्र आत:पुरे कन्या कुमरे दास दासी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

पुंडलिकें धरिला चांगोबाच हात । तंवा सकळ संता कळवळती ॥१॥ पताकांचे भार समाधि भोंवते । तेव्हां साधुसंत उठावले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

पुंडलिकें सूख दाखविलें लोकां । विठ्ठल नाम नौका तरावया ॥१॥ जाय पंढरीसी जाय पंढरीसी । पाहे विठोबासी डोळेभरी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा