भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुंडलीक म्हणे देवा । आतां करावा वास येथें

pundalik mhane deva | atan karava vas yethen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पुंडलीक म्हणे देवा । आतां करावा वास येथें ॥१॥ असों एक जीवे प्राणें । मीतूंपणे वोसंडुनी ॥२॥ बहुत बरें म्हणती देव । ठेविले पाव विटेवरी ॥३॥ निळा म्हणे नव्हे तुटी । युगापाठीं युग जातां ॥४॥