भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुढे ऋषिश्रवरांची मांदी । बैसली होती सभासंधी । तेही आशिर्वाद शब्दीं । मंत्रघोषी गर्जिन्नले

pudhe rushishravaranchi mandi | baisali hoti sabhasandhi | tehi ashirvad shabdin | mantraghoshi garjinnale

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पुढे ऋषिश्रवरांची मांदी । बैसली होती सभासंधी । तेही आशिर्वाद शब्दीं । मंत्रघोषी गर्जिन्नले ॥१॥ मंगळतु-यांचे घोषगजर । दुंदभी वाजविती सुरवर । नंदरायाचें भाग्य थोर । देव वर्णिती निज मुखें ॥२॥ निगम येउनि मूर्तिमंत । श्रीकृष्णाची स्तवनें करीत । कामधेनुही क्षीरे स्त्रवत । तुप्ति सकळांसी दयावया ॥३॥ देवगुरु जे बृहस्पती । तेहि़ अर्शिर्वादें कृष्णातें स्तविती । शुक्राचार्यही प्रज्ञामूर्ति । कृष्णाचे वर्णिती कीर्तिघोष ॥४॥ उमा रमा रेणुका सती । लोपामुद्रा अरुंधती । अक्षवाणें घेऊनिया हाती । आत्मया ओवाळिती श्रीकृष्णा ॥५॥ अनसूर्या परम प्रतिव्रता । अत्रिदेवाची जे कांता । जिचिये उदरी श्रीअवधूता । दत्तात्रय जन्म महामूनी ॥६॥ निळा म्हणे तेहि येउनी । हरातें वोसंगा घेउनी । आशिर्वादें अमृतवचनीं । गौरविती यशोदें ॥७॥