भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुंडलिकें नवल केलें । गोपिगोपाळ आणिले

pundaliken naval kelen | gopigopal anile

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पुंडलिकें नवल केलें । गोपिगोपाळ आणिले ॥१॥ हेंचि देईं ह्रषिकेशी । तुझें नाम अहर्निशीं ॥२॥ नलगे आणिक प्रकार । मुखीं हरि निरंतर ॥३॥ रूप न्याहाळिन डोळां । पुढें नाचेन वेळोवेळां ॥४॥ सर्वांठायीं तुज पाठें । ऐसें देऊनि करीं साह्य ॥५॥ धांवा करितां रात्र झाली । दासी जनीसी भेट दिली ॥६॥