भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुंडलिकें उभा केला । भक्त भावाच्य आंकिला

pundaliken ubha kela | bhakta bhavachya ankila

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पुंडलिकें उभा केला । भक्त भावाच्य आंकिला ॥१॥ युगें जालें अठठावीस । उभा मर्यादा पाठीस ॥२॥ सम पाउलीं उभा । कटीं कर कर्दळीगाभा ॥३॥ गळां वैजयंती माळ । मुगुट दिसतो तेजाळ ॥४॥ एकाजनार्दनीं शोभा । विठ्ठल विटेवरी उभा ॥५॥