भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुंडलिके नवल केलें । गोपिगोपाळ आणिलें

pundalike naval kelen | gopigopal anilen

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
पुंडलिके नवल केलें । गोपिगोपाळ आणिलें ॥१॥ हेंचि देई हृषीकेशी । तुझें नाम अहर्निशीं ॥२॥ नलगे आणिक प्रकार। मुख हरी निरंतर ॥३॥ रूपन्याहाळिनडोळां । पुढेनाचेनवेळोवेळां॥४॥ सर्वांठायीं तुज पाहे । ऐसें देऊनि कर्री साहा ॥५॥ धांवा करितां रात्र झाली । दासी जनीसी भेट दिली ॥६॥