भजनी मालिका
← भजनांकडे परत

पायांवरी ठेविती भाळ । तें प्रेमळ वारकरी

payanvari theviti bhal | ten premal varakari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पायांवरी ठेविती भाळ । तें प्रेमळ वारकरी ॥१॥ जन्मोजन्मीं त्यांचा संग । द्या अभंग सर्वदा ॥२॥ सर्वकाळ वाचे । दुजें साचें नाठविती ॥३॥ एका जनार्दनीं त्यांचा संग । घडावा सर्वांगें मजसी ॥४॥