भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाळिलीं पोसिलीं तुमचिया नावें

palilin posilin tumachiya naven

पाळिलीं पोसिलीं तुमचिया नावें । तें वर्म ठावें झालें आतां ॥१॥ नष्ट क्रियमाण होसी तूंचि देवा । काय बा केशवा म्हणों तुज ॥२॥ विश्वाचा साक्षी असोनि वेगळा । तयासी लागला बोल देवा ॥३॥ कर्ममेला म्हणे तुमची हे नित । तुम्हासी उचित गोड वाटे ॥४॥