भजनी मालिका
← भजनांकडे परत

पायीं चित्त हें राहिलें । ब्रम्हरुप पैं जाहलें

payin chitta hen rahilen | bramharup pain jahalen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पायीं चित्त हें राहिलें । ब्रम्हरुप पैं जाहलें ॥१॥ मन झालें हें उन्मन । स्वरुपीं झालें तें लीन ॥२॥ बुध्दि बोध्दव्या मुकली । एकाकारता पावली ॥३॥ निळा म्हणे नाहीं देह । तेथें कैंचा तो संदेह ॥४॥