भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाठीलागे काळ येतसे या लागें । मी माझें वाउगें मेंढीऐसें

pathilage kal yetase ya lagen | mi majhen vaugen mendhiaisen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाठीलागे काळ येतसे या लागें । मी माझें वाउगें मेंढीऐसें ॥१॥ आतां अगी लागो ऐसिया वेव्हारा । तूं माझा सोइरा पांडुरंगा ॥ध्रु.॥ वागविला माथां नसतां चि भार । नव्हे तें साचार देखिले तों ॥२॥ तुका म्हणे केलें जवळील दुरी । मृगजळ वरी आड आलें ॥३॥