भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाठी लागे तया दवडीं दुरी । घालीं या बाहेरी संवसारा

pathi lage taya davadin duri | ghalin ya baheri sanvasara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पाठी लागे तया दवडीं दुरी । घालीं या बाहेरी संवसारा ॥१॥ येउनि दडें तुमच्या पायीं । धांवें तई छो म्हणा ॥ध्रु.॥ पारखियाचा वास पडे । खटबड उठी तें ॥२॥ तुका म्हणे लाविला धाक । नेदी ताक खाऊं कोणी ॥३॥