भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांचासहित लयातीत जालिये वो

panchasahit layatit jaliye vo

पांचासहित लयातीत जालिये वो । प्रेम भक्ती अनुसरलें वो काळ्या रुपासी ॥१॥ ठायींचाची काळा अनादि बहु काळा । म्हणोनि वेदा चाळा लाविलागे माये ॥२॥ बापरखुमादेविवरें जन्मावेगळें पै केलें । म्हणोनि भाज जाले बाईयेवो ॥३॥