भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाचारितां यावें बोळविता जावें । हें तों न संभवे तुम्हांपाशीं

pacharitan yaven bolavita javen | hen ton na sambhave tumhampashin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पाचारितां यावें बोळविता जावें । हें तों न संभवे तुम्हांपाशीं ॥१॥ जेथिल तेथेंचि प्रगटाल रुपडें । आपुल्या सुरवाडें भक्तांचिया ॥२॥ जाणें येणें नाहीं तुम्हां कदाकाळीं । असा भूमंडळीं व्यापूनियां ॥३॥ निळा म्हणे ऐसें जाणोनियां मनीं । करितों अनुदिनीं स्तवन तुमचें ॥४॥