भजनी मालिका

भजने

नेणों कळायुक्ती व्युप्तत्ती सर्वथा । करुं हरिकथा नाम गाऊं ॥१॥ कलियुगामाजीं साधन वरिष्ठ । श्रेष्ठांचे तें श्रेष्ठ नाम जपुं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नेणों काय पुर्वार्जित । होतें सुकृत निक्षेपिचें ॥१॥ तेंणें हातीं धरोनियां । संती ठाया पावविलों ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नेणों कांहीं तुम्ही आपुलियां सुखें । इतरांचि दु:खें पिडिति तें ॥१॥ यातना बहुवस संसारकाचणी । जाचति जाचणि जन्म जरा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नेणों कोणे काय देवासी दिधलें । मागत वाहिलें तयापाशीं ॥१॥ पेरावें जें शेती तेचि फळप्राप्ती । वाया काय गुंती आपुले मनीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

नेणों तुमचे मन कठिण कां झालें । मज कांहीं न कळे पूर्व कर्म ॥१॥ किती आठवण मागिलाचि करूं । तेणें पडे विचारू पुढीलासी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

नेत्र झांकविले ते हरी । कारण इतुलेंचि अभ्यंतरी । मज विराट झालियावरी । छळतील हे देखतां ॥१॥ तंव तें भावार्थी चोखडे । त्याणीं देखिलें तें निवाडें । मग नाचती कृष्णापुढें । कीर्ति त्याची वर्णित ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नेत्र माझे रोडले आठवे माहेर । कैं भेटेन निरंतर बाईयांनो ॥१॥ चतुर्भुज विठ्ठलु कैं देखेने डोळां । भक्तांचा जिव्हाळा जीव माझा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नेत्राचेनीं तेजें पोळला चंडाश । नभचि नाहीं तेथें कैंचे अवकाश ॥१॥ रात्र हारपली पाहुं मी कोठें । दिवस रुसुनी गेला पहातां न भेटे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नेत्रीं अश्रुधारा पडती अपार । तेणें पृथ्वीवर पूर ताहे ॥१॥ ह्मणे तुह्यांवीण कैसा प्राण धरूं । वांचुनियां करूं काय आतां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नेत्रीं अश्रूधारा उभा भीमातीरीं । लक्ष चरणावरी ठेवोनियां ॥१॥ कां गा मोकलीलें न येसी गा देवा । काय मी केशवा चुकलोंसे ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

नेत्रींची बाहुली वस्तुरुप झाली । पाहतां सोहं मेळीं चिदांनंद ॥१॥ अर्ध मात्रा स्थान नयनाचें निधान । मसुरेप्रमाण महावर्ण तेथें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ