भजनी मालिका

भजने

नीचाचे संगती देवो विटाळला । पाणीये प्रक्षाळोनि सोंवळा केला ॥१॥ मुळींच सोवळा कोठें तो वोंवळा । पाहतां पाहाणें डोळा जयापरी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

नीत नवा प्रेमा कृपेचिया बळें । अंतरीं हा वोळे आनंदघन ॥१॥ नाचतीं मयूरें रोमांचीत दाटी । अमृताची वृष्टी जीवनकळा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नीर मंथुनी मंथन पैं केले । सार असार तें चवीस आलें ॥१॥ ताक तेंहीं गोड दूध देंही गोड । रसनेची चाड पारुषली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नीळवर्ण रज । नीळवर्ण बुझे । निळिमा सहजे । आकारली ॥१॥ नीळ प्रभा दिसे । नीळपणें वसे । निळिये आकाश । हरपलें ॥ध्रु०॥

नीळवर्ण वृक्ष तो अति दृश्य । पाहतां सावकाश दृष्टी न पडे ॥१॥ भलें कोडें कान्होबा हें तुझें । लय लक्षा न कळे म्हणती माझें आणि तुझें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नुठेचि मन वरुनियां । जडोनी ठेलें हरीच्या पायां ॥१॥ बुध्दि निश्येंसी राहिली । परम विश्रांति पावली ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नुरवूनि दुसरें आतां ठेलों चरणीं । नित्यानंद भोगीतुंचि दिनरजनीं ॥१॥ आळवूनि वाचें याचीं उत्तम नामें । सारिन काळ याचिपरि सुखसंभ्रमें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नेघों आम्ही कदा भुक्ति आणि मुक्ति । हरिनामीं विश्रांति सर्व जोडे ॥१॥ काय कराव्या त्या रिध्दी आणि सिध्दी । वाउग्या उपाधी भजना गोंवा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नेटकेंचि दैव उघडलें आजीं । तो हा मजमाजीं संचरला ॥१॥ आतां कैसें करुं मी यासी । नावरेंचि मनासी आवरितां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

नेणतां नेणतां कां रे अंध होशी । माझें म्हणविशी कां रे बळें ॥१॥ तूं कोण कोठील आहेसी कोणाचा । शिणतोसी साचा मी माझें म्हणुनी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ