भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेत्राचेनीं तेजें पोळला चंडाश । नभचि नाहीं तेथें कैंचे अवकाश

netrachenin tejen polala chandash | nabhachi nahin tethen kainche avakash

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नेत्राचेनीं तेजें पोळला चंडाश । नभचि नाहीं तेथें कैंचे अवकाश ॥१॥ रात्र हारपली पाहुं मी कोठें । दिवस रुसुनी गेला पहातां न भेटे ॥२॥ अंगाचेनी तेजें डोळा आली चवी । पाहुं गेलों तंव बुडाला रवी ॥३॥ एका जनार्दनीं पाहतां पाहणें । रात्रंदिवस दोन्हीं गेलें हरपोन ॥४॥