भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेत्र नीर समुद्र देखा । क्षीर सत्रावी ओळखा

netra nir samudra dekha | kshir satravi olakha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नेत्र नीर समुद्र देखा । क्षीर सत्रावी ओळखा ॥१॥ दधिसमुद्र नाकीं आहे । खारा शरीरीं तो पाहें ॥२॥ नाभीं रत्नाकर देखा । माथां मदन ओळखा ॥३॥ नामा म्हणे सांगूं काय । मन समुद्र ह्रदयीं आहे ॥४॥