भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेणता म्हणूनी चाळविसी मज

nenata mhanuni chalavisi maj

नेणता म्हणूनी चाळविसी मज । परी जीवीचें गुज कळेचिना ॥१॥ न कळे न कळे तुमचें मानस । मी तो कासाविस जीवें झालों ॥२॥ बोलतां न येचि बहुत प्रकार । प्रथमचि भार वागविला ॥३॥ कर्ममेळा म्हणे ऐक पंढरीराया । बोलियेलें वाया बोल नको ॥४॥