भजनी मालिका
← भजनांकडे परत

नुघडितां दृष्टि न बोले तो वाचा

nughaditan drushti na bole to vacha

नुघडितां दृष्टि न बोले तो वाचा । हरिरूपी वाचा तल्लीनता ॥ १ ॥ उठि उठिरे नाम्या चालरे सांगातें । माझे आवडते जीवलगे ॥ २ ॥ कुरवाळीला करें पुसतसे गूज । घेई ब्रह्मबीज सदोदित ॥ ३ ॥ ज्ञानासि लाधलें निवृत्ति फावलें । सोपाना घडलें दिनकाळ ॥ ४ ॥ तें हें रे सखया खेंचरासि पुसे । गुरुनामी विश्वासे ब्रह्मरूपें ॥ ५ ॥ निवृत्ति म्हणे आतां अनाथा श्रीहरि । तूंचि चराचरी हेचि खुण ॥ ६ ॥