भजनी मालिका
← भजनांकडे परत

नरदेही आलिया मुखीं नाम गाय । वायां आयुष्य न जाय ऐसें करी

naradehi aliya mukhin nam gay | vayan ayushya na jay aisen kari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नरदेही आलिया मुखीं नाम गाय । वायां आयुष्य न जाय ऐसें करी ॥१॥ प्रपंचमृगजळीं गुंतुं नको वायां । कन्या पुत्रादिक या सुख नोहे ॥२॥ सोईरे धाईरे वायांचि हांवभरी । पाडिती निर्धारी भोंवरजाळीं ॥३॥ एका जनार्दनीं संसाराचा छंद । वायांक मतिमंद भुललासे ॥४॥