भजनी मालिका
← भजनांकडे परत

नलगे चिंता आतां अनुमोदना हाता

nalage chinta atan anumodana hata

नलगे चिंता आतां अनुमोदना हाता । आलें मुळ भ्राता गेला त्याचें ॥१॥ घरभेद्या येथें आहे तें सुकानु । धरिती कवळून पाय दोन्ही ॥२॥ त्याचें त्याचिया मुखें पडियेलें ठावें । नलगे सारावें मागें पुढें ॥३॥ तुकयाबंधु म्हणे करील भेटी भावा । सोडीन तेधवां या विठ्ठला ॥४॥