भजनी मालिका

भजने

तुम्हीं तरी हो श्रीयेचा पति । माझी बहु हीन याती ॥१॥ दोघे असों एके ठायीं । माझा माथा तुझे पायीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुम्हीं तंव उदार मायबाप संत । करावें कृतार्थ मजलागीं ॥१॥ ठेवा माथां हात वंदुं पायवाणी । आणिक दुजें मनीं नाहें कांहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तुम्ही तों कृपेचे सागर । परि दुस्तर कर्म माझें ॥१॥ म्हणेनियां नये करुणा । माझिया दुर्गुणा देखोनी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तुम्ही तों सांकडें बहुत वारिलें । आतां कां उगलें बोलूं देवा ॥१॥ आजीवरी पडिलों लिगाडाचे गुंतीं । तेणेंचि फजिती झाली दिसे ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

तुम्ही देवा प्रत्यक्ष असा । परि मी कैसा ओळखों ॥१॥ जेव्हां प्रगटोनि भेटी दयाल । तेव्हांचि फावाल सुरवाडें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तुम्ही बहुतांचे केलेंसे धांवणें । आतां नारयणें कठेण केलें ॥१॥ हो उनी उदास अवलोकितो दिशा । पुरवा माझी इच्छामायाबापा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तुम्ही बैसलेती निर्गुणाचे खोळे । आम्हां कां हे डोळे कान दिले ॥१॥ नाइकवे तुझी अपकीर्त्ति देवा । अव्हेरली सेवा न देखवे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुम्ही माझा देवा करा अंगीकार । हा नाहीं विचार मजपाशीं ॥१॥ आतां दोहीं पक्षीं लागलें लांछन । देवभक्तपण लाजविलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुम्ही ये तरी सांगा कांहीं । आम्हांविशीं रखुमाबाई ॥१॥ कांहीं उरलें तें ठायीं । वेगीं पाठवुनी देई ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुम्ही येथें पाठविला धरणेकरी । त्याची जाली परी आइका ते ॥१॥ आतां काय पुढें वाढवुनि विस्तार । जाला समाचार आइका तो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुम्हीं वाढविलें तुम्हीं पोसियेलें । तुम्हींच दाविलें जग मज ॥१॥ तुमचा प्रकार तुमचा तुम्ही जाणा । आमुचिया खुणा जाणों आम्हीं ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

तुम्हीं वेदरुप भूदेव प्रत्यक्ष । दरुषणेंचि मोक्ष जडमूढा ॥१॥ सकळही तीर्थें तुमच्या वसती पायीं । तेथें आमुचे कायीं उरती दोष ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुम्ही सकळिक संत आहांत सज्ञान हैं माझें अज्ञान फार आहे॥१॥ याजबरोबर चालावी हो वाटे। मोडतील कांटे सांभाळावें ||२||

रचनाकार: संत जनाबाई