भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्ही बैसलेती निर्गुणाचे खोळे । आम्हां कां हे डोळे कान दिले

tumhi baisaleti nirgunache khole | amhan kan he dole kan dile

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुम्ही बैसलेती निर्गुणाचे खोळे । आम्हां कां हे डोळे कान दिले ॥१॥ नाइकवे तुझी अपकीर्त्ति देवा । अव्हेरली सेवा न देखवे ॥ध्रु.॥ आपुले पोटीं तों राखियेला वाव । आम्हांसी कां भाव अल्प दिला ॥२॥ तुका म्हणे दुःखी असें हें कळों द्या । पुढिलिया धंद्या मन नेघे ॥३॥